Oct 16

सप्तशती गुरूचरित्र :: अध्याय बेचाळीसावा

श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) रचित "श्री सप्तशती गुरूचरित्र"


तत्र स्थोदङ्‌मानसयात्रा । करीं पंचक्रोशीयात्रा । शुक्लकृष्णपक्षयात्रा । नित्ययात्रा करी भावे ॥१॥
प्रत्यक्षचि विश्वेश्वरा । भवानी हरिधुंडीश्वरा । दंडपाणी भैरववीरा । विघ्नेश्वरा गुहा देखी ॥२॥
तूं स्थीर चित्तें करीं यात्रा । स्थापी लिंग तूं कुमारा । सुटतील येरझारा । असें म्हणोनी गुप्त झाला ॥३॥
बाळ उठोनी पहात । त्या न दिसे, झाला गुप्त । हाची माझा गुरु म्हणत । करीतसें तो यात्रा ॥४॥
अवाच्य हो शिवलीला । इष्ट वर दे तयाला । दे तो तसें गुर्वादिकांला । तो झाला विश्वकर्मा ॥५॥
द्विज तेव्हां गुरु जसें । सांगे तें ते पाहे तसे । गुरुनाथा वंदितसे । स्तवितसे सायंदेव ॥६॥
तूंची उमापती होसी । मज दाविली येथ काशी । गुरु म्हणें त्वद्वंशासी । एकविंशी घडे यात्रा ॥७॥
तूं सत्तम लोकी होसी । आतां न सेंवीं म्लेच्छासी । आणूनिया स्त्रीपुत्रांसी । आम्हापाशीं रहासेवित ॥८॥
तो नमःस्कारुनी गेला । स्वकुटुंबा घेऊनि आला । स्तवि पुनः श्रीगुरुला । कानदीस्तोत्रालापें ॥९॥
त्याचा पुत्रा नागनाथ । तया वर दे गुरुनाथ । सांगे सांयदेवा स्वस्थ । करी अनंतव्रत आजी ॥१०॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सारे काशीयात्रानिरुपणं नाम द्विचत्वारिंशोऽध्यायः

 

श्री गुरुदेव दत्त...!!!

Oct 15

सप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एक्केचाळीसावा

श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) रचित "श्री सप्तशती गुरूचरित्र"


निरहंकार त्वत्पूर्वज । सायंदेव कथिला तूज । गाणगापुरीं वसे निज । गुरुराज साक्षाद्देव ॥१॥
हीतद्वार्ता परिसून । ये घालित लोटांगणा । देवा पाहतां हो तल्लिन । करी स्तवन प्रेमरसे ॥२॥
गुरु विचारिती क्षेम । येरु सांगे धरुनी प्रेम । भवत्सेवाकांम । धरुनी, धाम सोडियेलें ॥३॥
घ्यावीमौजभक्तिरसाची । असी इच्छा हे मनाची । गुरु म्हणे सेवा आमुची । कठीणसाची नेणसी तूं ॥४॥
कधीं पुरामध्यें वास । ग्रामीं वनीं नदीतीरास । तुला होती कष्ट सायास । कां तूं त्रास पतकरसी ॥५॥
तो करुनी अंगिकार । राहे गुरुच्या बरोबर । त्याला एकला बाहेर । संगमावर न्हेति गुरु ॥६॥
जो दोषौ घा स्मरणें हरी । तो संकटी त्यजि कीं हरी । हार्दे शिष्य परिक्षा करी । आज्ञा करी मेघा वर्षूं ॥७॥
तेव्हां लोटुनी टांकी वारा । वर्षे मेघ मोठया धारा । द्विजें सांहुनी वृष्टी वारा । रक्षिलें वस्त्राश्रये देवा ॥८॥
गुरु केवल परीक्षार्थ । अग्नि आणावया धाडित । विद्युत्तेजें ये गांवांत । अग्नि भांडयांत घेऊन ये ॥९॥
प्रत्यक्ष पथिं सर्पां देखे । पळतां, मठीं ध्वनी ऐके । प्रकाश देखे मनीं ठके । येउनि देखे एका देवा ॥१०॥
सर्प रक्षार्थ धाडिले । तुझें मन वायां भ्यालें । कठिण सेवा हें कळलें । साहस केलें त्वा गुरु म्हणे ॥११॥
हो पश्चत्ताप कीं तुला । द्विज म्हणे देवा मला । जाणसी, मी काय तुला । सांगूं मला न दवडीं ॥१२॥
प्रत्यक्ष तूं ब्रह्मनिधान । गुरुसेवेचें विधान । सांगा तेणें स्थिर होईन । तें ऐकून गुरु सांगे ॥१३॥
कुमार त्वष्ट्रदेवाचा । विद्यार्थी हो गुरुचा । भाव पहावया त्याचा । गुरु साचा वदे तया ॥१४॥
करी एक गृह निर्माण । जें न तुटे नोहे जीर्ण । करी वृष्टयादि निवारण । तें ऐकुन तत्स्त्री बोले ॥१५॥
न शिंवली न विणली । अंगाबरोबर भली । अशी रम्य दे मज चोळी । त्यावेळीं तत्सुत बोले ॥१६॥
माझ्या चरणा सुख देती । खात न लागे, मनोगती । दे पादुका जळींन बुडती । गुरुकन्या तीही बोले ॥१७॥
हों अक्षयैकस्तंभघर । न हो पात्रीं पाक गार । काजळ न लागे त्यावर । दे सुंदर कुंडलें हीं ॥१८॥
कुमार तो स्विकारुन । त्यां वंदून धरी रान । तेथें अवधूत येऊन । म्हणे कां म्लान मुख तुझें ॥१९॥
मनस्समाधान करुन । बाळ सांगे सर्व नमून । येरु तया आश्वासून । काशीसेवन करीं म्हणे ॥२०॥
जें शर्वाचें अधिष्ठान । गंगा राहे ज्या वेष्टन । सर्वदेवतीर्थस्नान । तत्सेन करीं शीघ्र ॥२१॥
न कोणिही येथ अमुक्त । म्हणोनी हें अविमुक्ता । विरक्त किंवा विषयासक्त । तेही मुक्त होती जेथे ॥२२॥
दुजें भूमंडळीं न असें । येरु वदे मी नेणतसें । काशीक्षेत्र मिळेल कसें । प्रार्थितसें मी तुम्हांसी ॥२३॥
म्हणे तापसी मी दावीन । त्वद्योगें हो मज दर्शन । असें म्हणूनी त्या घेऊन । ये तत्क्षण मनोगती ॥२४॥
घेऊनी अला मनोगति । काशीयात्रा भावभक्तीं । करीं यथाविधि, निगुती । पूर्ण होती मनोरथ ॥२५॥
तो ऐकूनि त्याचें वचन । म्हणे नेणे यात्राचरण । येरु म्हणे स्नान करुन । मणिकर्णिकेचें येई ॥२६॥
तूं भेट विश्वेश्वरा । करीं अंतर्गृहयात्रा । मगदक्षिणमानसयात्रा । स्नानार्चनश्राद्धदानें ॥२७॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सारे काशीयात्रानिरुपणं नाम एकचत्वारिंशोऽध्यायः

 

श्री गुरुदेव दत्त...!!!

Oct 12

सप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चाळीसावा

श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) रचित "श्री सप्तशती गुरूचरित्र"


एक वेदज्ञ ब्राह्मण । श्वेतकुष्टें व्यापून । गुरुप्रति येऊन । म्हणें दीननाथा तारीं ॥१॥
झालों दैवें कुष्टी म्हणून । तोंड हें न पाहती जन । ह्यांचें करीं तूं शमन । नातरीं प्राण सोडीन मी ॥२॥
पुरश्वर्यादिकें पाप । न जाता हो उलट ताप । देवा तूंची मायबाप । माझें पाप शमवीं हें ॥३॥
आश्वासन देती गुरु । तंव आला एक नर । शुष्ककाष्ठ डोईवर । घेवोनि ठरला तो तेथें ॥४॥
अपूर्वैक चमत्कार । करुं इच्छी गुरुवर । सांगे विप्रा घे झडकर । संगमावर रोवीं काष्ठा ॥५॥
अविरत सेवीं यासी । पाला येतां शुची होसी । द्विज रोवी त्या काष्टासी । सद्भावें जल शिंपी ॥६॥
लोक हसुनि वारिती । नायके तो गुरुप्रती । ते येवोनी तें सांगती । गुरु म्हणती भाव फले ॥७॥
अप्रमेय भावफल । धनंजयवाक्यें सुशील । लिंगा चिताभस्म दे भिल्ल । एकदां लब्ध न हो भस्म ॥८॥
इच्छी वपू जाळावया । मला जाळी म्हणे भार्या । भस्म दे, तिला जाळुनियां । प्रसाद ध्याया आली तीच ॥९॥
तयेवेळीं प्रगटे हर । तया देई इष्ट वर । असा भावाचा प्रकार । म्हणूनी गुरु जाती तेथें ॥१०॥
त्या उद्योगातें पाहून । करितीं काष्ठा प्रोक्षण । आले अंकूर फुटोन । विप्र स्वर्णवर्ण झाला ॥११॥
बरवे अंकुर फुटले । कुष्ठ सर्व मावळलें । द्विजें स्तवना आरंभिलें । तैं उदेले अष्टभाव ॥१२॥
शांतदांत इंदुकोटिकांदीप्त अत्रिनंदना । देंववृंदवंद्यपाद दत्त भक्तचित्तरंजना ॥१३॥
पापतप्ततापभंजना सनातना जनार्दना । मायिकांधकारसूर्य दत्त भक्तचित्तरंजना ॥१४॥
दत्तकृत्तकामरोष वेषधारि भिक्षु तूं जना । इष्ट देसि धर्म पासि दत्त भक्तचित्तरंजना ॥१५॥
राग द्वेष दोष वारिं, तारिं सूर्यचंद्रलोचना । भक्तकामधेनु तूंची दत्त भक्तचित्तरंजना ॥१६॥
हस्तिंदण्ड कुंडि घेसि देसि जीव वीतजीवना । रक्तपद्मपत्रनेत्र दत्त भक्तचित्तरंजना ॥१७॥
तूंचि विश्वहेतु मंतु सोसि होसि मायबाप ना । नित्य शुद्ध बुद्ध मुक्त दत्त भक्तचित्तरंजना ॥१८॥
तूंचि देव योगि होसि नासिं दैन्यदुःखकानना । न्यासि होसि कृष्नावासि दत्त भक्तचित्तरंजना ॥१९॥
ब्रह्मवस्तु तूं अनादिमध्यनाश खास वासना । वारिं, भक्ति देयिं तारिं दत्त भक्तचित्तरंजना ॥२०॥
तयाचा भाव जाणुनि विप्रा । विद्यासरस्वतीमंत्रा । देऊनियां सकलत्रा । राहवि मित्रापरी गुरु ॥२१॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सारे विप्रकुष्ठहरणं नाम चत्वारिंशोऽध्यायः

 

श्री गुरुदेव दत्त...!!!

Oct 11

सप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकोणचाळीसावा

श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) रचित "श्री सप्तशती गुरूचरित्र"


एकविप्र सोमनाथ । तत्स्त्री वृद्धा वंध्या ख्यात । सेवी भावें गुरुनाथा । गुरु पुसती वांछा काय ॥१॥
ती कष्टो नी तयां म्हणे । अपुत्रा मी व्यर्थ शिणें । अश्वथाला भजतां जिणें । गेलें भेणें पुढती वाटे ॥२॥
पुढें मला होवो सुत । गुरु म्हणे कोण जाणत । पुढचें, आतां कन्यासुत । होवो म्हणे, ती गांठ बांधी ॥३॥
गुरुत्तम म्हणे हरीं । पिंपळाची निंदा न करीं । आम्ही सर्वदेव त्यावरी । ब्रह्मा सांगे नारदातें ॥४॥
श्रुतिस्मृती ज्याला गाती । त्याला करी मंदगति । प्रदक्षिणा लक्ष मिती । करीं अंतीं उद्यापन ॥५॥
द्यावे तिलस्वर्णाश्वत्थ । विप्रां भोजन दे निश्चित । होती तुजःकन्या सुत । नारी म्हणतसे देवा ॥६॥
मी दुर्ज्ञा ना वंचूं कशी । साठ वर्षे झालीं वयासी । होत नाहीं विटाळशी । तरी तसीच मी सेवी ॥७॥
ती त्यां न मुनी सेवि तशी । शीघ्र झाली विटाळशी । गर्भधरी पांचवे दिवशीं । कन्या ती सी झाली शुभा ॥८॥
परम हर्षें त्या कन्येसी । आणी नारी गुरुपाशीं । गुरु म्हणे हो सती ईसी । दीक्षित पति लाधेल ॥९॥
तुझे पोटीं मूर्ख शतायू । किंवा यावा बुध अल्पायू । ती म्हणे हो कां अल्पायू । दीर्घायू मूढ किमर्थ ॥१०॥
व्हावे हर्षद पंचसुत । तथा म्हणे गुरुनाथ । कन्ये घेऊन गृहाप्रत । ये हंसत ब्राह्मणी ती ॥११॥
झाला नंदन शीघ्र तिला । विद्वान सर्वगुणी भला । पांच पुत्र झाले त्याला । सर्वां झाला विस्मय ॥१२॥
तशीच कन्या दीक्षिताची । पत्‍नि झाली सती साची । कीर्ति पसरली त्यांची । श्रीगुरुची असी दया ॥१३॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सारे वृद्धवंध्याप्रसवो नामेकोन्चत्वारिंशोऽध्यायः

 

श्री गुरुदेव दत्त...!!!

Oct 10

सप्तशती गुरूचरित्र :: अध्याय अडतीसावा

श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) रचित "श्री सप्तशती गुरूचरित्र"


गुरुंस भिक्षाद्याया आला । भास्कर विप्रसामग्रीला । तिघापुरति घेऊनी त्याला । भक्तीनेला प्रसादा ॥१॥
तो सर्व सामग्रीला । निजे घेऊनि उसेला । तीन मास असा त्याला । न मिळाला शून्य वार ॥२॥
त्या हास्य करिती लोक । गुरु करविती पाक । म्हणती सांगे सर्व लोक । तो सांगे सर्वा भोजना ॥३॥
ते त्याचा बोला हंसती । कण वाटयान ये म्हणती । तें तो सांगे गुरुप्रती । बोलाविती तें त्यां सर्व ॥४॥
निरहंकार तो ब्राह्मण । करी पाक सुनिष्पन्न । गुरु वस्त्रें झांकवून । नेववून वाढविती ॥५॥
द्विज हृष्टचित्त जेविती । थोर सान सर्व येती । चार हजार झाली मिती । ते जेविती आकंठा ॥६॥
अन्न दिल्हें सर्व जातीला । आचंडालश्वकाकांला । तरी तोटा नाहीं आला । जेवविला गुरुनें विप्रा ॥७॥
अन्न संपेना तें जळीं । जलचरां दे त्या वेळीं । झाली ख्याती भूमंडळीं । वर त्यावेळीं देती विप्रा ॥८॥
हर्षुनियां वदती लोक । तिघांपुरतां होता पाक । जेविले हे अमित लोक । हें कौतुक दुसरें ऐक ॥९॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सारे अन्नपूर्तिकरणं नाम अष्टत्रिंशंऽध्यायः

 

श्री गुरुदेव दत्त...!!!

◄ Older PostsNewer Posts ►
Start Jap Online