Sep 18

सप्तशती गुरूचरित्र :: अध्याय बाविसावा

श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) रचित "श्री सप्तशती गुरूचरित्र"


गुरु वसे गाणगापुरीं । तेथें काय लीला करी । असें विप्रें पुसतां बरीं । लीला सारी सांगे सिद्ध ॥१॥
मी तो कः पदार्थ येथ । वर्णावया सर्व चरित । होती ब्रह्मादि कुंठित । तेव्हां संक्षिप्त सांगतों ॥२॥
अमेय कीर्ति गुरु आले । भीमामरजासंगमीं भले । गाणगापुरी राहिले । बैसले अश्वत्थीं तें ॥३॥
हो यद्गत्या गृह पावन । तो विप्रगृहीं येऊन । वांझमहिषी पाहून । ब्राह्मणस्त्रीतें बोले ॥४॥
सु सत्वा तूं दे क्षीरपान । ब्राह्मणी बोले वचन । वांझ म्हैंस हे दुभे न । गुरु दोहून दावीं म्हणे ॥५॥
मानून ती दोही क्षीर । दोन धडे दोहिलें क्षीर । गुरु पिऊनीं देती वर । हो दारिद्र दूर म्हणूनी ॥६॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सारे संन्यासदीक्षाग्रहणं नाम द्वादशोऽध्यायः


श्री गुरुदेव दत्त...!!!

Sep 17

सप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकविसावा

श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) रचित "श्री सप्तशती गुरूचरित्र"


तो होय गुरुनाथ । तियेप्रति सांगे हित । कोण कोणाचा हो सुत । वद ज्ञात असे तर ॥१॥
पृथ्व्यप्‌तेजोवाताकाश । हेच आले आकारास । मायामय संबंधास । तूंचि खास रडशी कीं ॥२॥
जरी सूनू तुझा हाची । पूर्वापर असे साची । सांग कथा प्राग्‌जन्माची । तूं कोणाची स्त्री की माता ॥३॥
जैं सूर्योदयास्तानें । नित्य दिन रात होणें । तेवीं कर्में जन्ममरणें । भोगणें सुखदुःख ॥४॥
कोणी नहें निवारिती । गुणमय ते मरती । देवादिकां हीच गती । मेला मागुती न ये शोके ॥५॥
दे हा शव जाळावया । ती म्हणे जो दे अभया । बाध ये कीं त्याच्या वाक्या । कोण तया पुढें भजे ।
सांगे शांत ब्रह्मचारी । हें जा पूस औदुंबरी । येरु शव बांधुनी उदरीं । पादुकेवरी शिर हाणी ॥७॥
बोल कोणाचा ऐकेना । लोक गेले स्वसदना । पतिअह ती अंगना । आक्रोशना करीतसे ॥८॥
स्वप्नी नको रडूं म्हणून । स्वामी देती आश्वासन । पाहे जगी होवून । पुत्र संजीवन झाला ॥९॥
विप्र पाहांटेस आले । त्यांणीं नवल हें ऐकिलें । सर्वां आश्चर्य तें झालें । असें झालें वाणूं किती ॥१०॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सारे मृतपुत्रसंजीवनं नाम एकविंशोऽध्यायः

 

श्री गुरुदेव दत्त...!!!

Sep 14

सप्तशती गुरूचरित्र :: अध्याय विसावा

श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) रचित "श्री सप्तशती गुरूचरित्र"


ऐसें परिसुनी विप्र । म्हणे तेथें कोणा वर । लाधला बोला सविस्तर । ऐकें उत्तर सिद्ध म्हणे ॥१॥
एक दशग्रंथी विप्र । शिरोळग्रामीं मृतपुत्र । तद्भार्येसी एक विप्र । सांगे उग्रकर्मविपाक ॥२॥
त्वां ब्रह्मस्वशत घेतलें । तया पिशाचत्व आलें । त्याणें तुझे सुत मारिले । कर्म केलें पाहिजे त्याचें ॥३॥
दे द्रव्य दद्गोत्रासी । सेवीं मास एक गुरुसी । येरु म्हणे न मजपाशीं । द्रव्य गुरुसी सेवीं भावें ॥४॥
अभयंकर रक्षु ऐसें । म्हणूनी सेवितसे । स्वप्नीं भूत मारीतसे । राखीतसे गुरु तिसी ॥५॥
सांगे तत् परिहार जसा । जागेंपणें करी तसा । तेणें मुक्त झाला पिसा । गुरु प्रसाद दे तिला ॥६॥
ती दोन पुत्र प्रसवे । ते दोघे दिसती बरवें । थोर होतां व्रत करावें । म्हणुनी वेचिती ते द्रव्य ॥७॥
श्रेष्ठ तनयाचें व्रत । आरंभिता धनुर्वात । होवोनि तो वांकत । सन्निपात न शमें यत्‍नें ॥८॥
तो तद्भावें फिरवी नेत्र । मरे होतां अर्धरात्र माता रडे पिटी गात्र । बोधमात्र नायके ती ॥९॥
दिवस मध्यान्हीही येतां । जाळाया ती न दे प्रेता । ब्रह्मचारी स्पष्टवक्ता । तेथें येतां झाला तेव्हां ॥१०॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते समंधपरिहारो नाम विंशोऽध्यायः

 

श्री गुरुदेव दत्त...!!!

Sep 13

सप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकोणीसावा

श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) रचित "श्री सप्तशती गुरूचरित्र"


हो हा संन्यासी म्हणून । भिक्षा मागे शिव आपण । हिरण्यकशिपु दारण । करितां नखें तापलीं ॥१॥
जो विज्ञैकगम्य हरि । तो श्रीदत्त औदुंबरीं । शांत होतां तयावरी । वास करी श्रीसहित ॥२॥
दे मार्ग कृष्णा तया । द्वीपीं राहे योगिनी तया । भिक्षा देती पूजूनियां । नेणूनिया विप्र म्हणती ॥३॥
न स्वछंदी गांवीं जायीं । पाहूं येथें काय खायी । ऐसें म्हणुनि ते ठायीं । राहता येयी भय त्याला ॥४॥
तत्रत्य नर गंगानुज । भावें आला त्या गुरुराज । दाखवूनी तेथील गुज । देती निजप्रीती वर ॥५॥
तो नमूनी त्रिस्थली पुसे । क्षणें गुरु दावितसे । गुरु जाऊं म्हणतसे । दुःख होतसे योगिनीसी ॥६॥
न गूढाः केपि में चेष्टा । विदुरित्येष पादुके । विन्यस्याश्र्वास्य ताः प्राप । श्रीगुरुर्गाणगापुरुम् ॥७॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते योगिनीवरदानं नाम एकोनविशोऽध्यायः

 

श्री गुरुदेव दत्त...!!!

Sep 12

सप्तशती गुरूचरित्र :: अध्याय अठरावा

श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) रचित "श्री सप्तशती गुरूचरित्र"


सुरेख क्षेत्र गुरु पाहे । कृष्णा पंचगंगा वाहे । तेथें द्वादशाब्द राहे । अजुनी आहे तेथें गुप्त ॥१॥
तेथें दुःखि विप्राघरीं । गुरु शाकभिक्षा करी । घेवडा वेल तोडी करीं । ब्राह्मणी करी दुःख तेव्हां ॥२॥
तद्‌दुःख हरावया । वेलातळीं देई तयां । धनकुंभ गुरुराया । म्हणे तया न प्रगटा हे ॥३॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सारे धनकुंभप्रदानं नाम अष्टादशोऽध्यायः

 

श्री गुरुदेव दत्त...!!!

◄ Older PostsNewer Posts ►
Start Jap Online