Sep 25

सप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सत्ताविसावा

श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) रचित "श्री सप्तशती गुरूचरित्र"


हूं आस्था पूर्ण करुं । असें म्हणूनी श्रीगुरु । दूर पाहती मांग नरु । शिष्यां निरुपिती आणाया ॥१॥
जाउनि शिष्यें तया । आणिती गुरुराया । सात रेखा काढूनिया । आणिती तयावरी तया ॥२॥
तो एक एक लंघितां । सांगे सप्तजन्मवार्ता । अंतीं विद्वदद्विज म्हणतां । जिंक विप्रा म्हणती गुरु ॥३॥
सामर्ष तो पुढें होतां । ये त्यां विप्रां मूढता । द्वादशाब्द राक्षसता । ये मुक्तता त्यानंतर ॥४॥
दुर्गति त्या अनुतापानें । ये स्वल्प गुरुकृपेनें । विप्र होऊनि मांगाने । गार्‍हाणें गुरुसी केलें ॥५॥
सद्वंशजद्विज असून । केवि झालों जातिहीन । हे सांगा विस्तारुन । तें ऐकूण गुरु सांगे ॥६॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सारे द्विजगर्वपरिहारो नाम सप्तविंशोऽध्यायः

 

श्री गुरुदेव दत्त...!!!

Sep 24

सप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सहविसावा

श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) रचित "श्री सप्तशती गुरूचरित्र"


वेद केवळ म्हणावया । हो सायास ऋषिवर्या । कलियुगीं अल्पायुष्यां । केवीं आग्नायांतीं गती ॥१॥
चिरंजीव भरद्वाज । ब्रह्मा पुसे वेदगुज । तीन राशी दावी अज । ऋषी लाजला तेधवा ॥२॥
दे देव मुष्टी तीन । न तया आले अजून । हे अनंत वेद जाण । विभागून ठेविले तूर्त ॥३॥
विष्णू भूतळीं व्यासरुपी । चौशिष्यां चार निरुपी । वेद शाखा विभागरुपी । पैला निरुपी ऋग्वेद ॥४॥
शुद्धांतः करणें पैला । ऐक सांगो ऋग्वेदाला । द्वरत्‍निमात्र रुप त्याला । व्यक्तगळा दीर्घदृष्टी ॥५॥
रवि समान कांति ज्यांची । अत्रीगोत्र देवता ज्याची । ब्रह्मा गायत्री छंदची । आयुर्वेदचि उपवेद ॥६॥
शाखा नामें भेद पांच । सहा अंगें ब्राह्मणच । अरणेंशीं हो वेदच। पैलासच व्यास सांगे ॥७॥
शिष्य तयाचा दुसरा । वैशंपायन नामें बरा । तया यजुर्वेद दुसरा । सांगे बरा विभागून ॥८॥
सुमनः प्रीती जो यजनें । करी पंचारत्‍नी मानें । भारद्वाज गोत्र जाणें । कृशपणें त्रिष्टुप्‌छंद ॥९॥
दैव महा विष्णु ज्याचें । उपवेद धनु ज्याचें । सूर्याभ जो भेद त्याचे । जाण साचे श्याऐशीच ॥१०॥
सुमनः प्रीती दे स्तवनें । सामवेद अभिधानें । षड्‌रत्‍निमितमानें । जैमिनीनें घेतला हा ॥११॥
विशेष हा शांत दांत । असे चर्मदंडहस्त । गोत्र काश्यप दैवत । रुद्र ख्यात जगतीछंद ॥१२॥
जो ओष्ठा रक्त असे । याच्या भेदा मिती नसे । ज्याचा उपवेद असे । गंधर्व असें सांगे व्यास ॥१३॥
भुवनीं सांग भेद याचे । कोण बोलेल वाचे । सांगोपांग वदतां वाचे । शेषाचेही ये शीण ॥१४॥
अतींद्रिय ज्ञाता व्यास । ऐक म्हणे सुमंतूस । सांगे अथर्ववेदास । हो देवेश देव त्याचा ॥१५॥
असे याचा उपवेद । अस्त्र वेद तिसरा छंद । गोत्र बैजान स्वछंद । नऊभेद कल्प पांच ॥१६॥
हे कोणि चारही पूर्ण । एवढे न जाणिले जाण । एक शाखा ही अपूर्ण । तुम्ही पढून सर्वज्ञ कीं ॥१७॥
जे विप्र धर्मयुक्त । विष्णु मानी त्यां दैवत । वेदबळें हस्तगत । तयां होत देवादिक ॥१८॥
जे स्वकृत्या सोडुनी देती । ग्लेच्छापुढें वेद पढती । ब्राह्मणातें जिंकिती । ते होती ब्रह्मराक्षस ॥१९॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सारे चतुर्वेदकथनं नाम षड्‌विंशोऽध्यायः

 

श्री गुरुदेव दत्त...!!!

Sep 21

सप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पंचविसावा

श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) रचित "श्री सप्तशती गुरूचरित्र"


होते मंदधीब्राह्मण । म्लेच्छराजापुढें येऊन । सार्थवेद म्हणून । घेती धन उन्मत्त ते ॥१॥
म्लेच्छा मदोन्मत्त विप्र । म्हणती आज्ञा द्यावी क्षिप्र । वादें जिंकूं लोकीं विप्र । हारिपत्र किंवा घेवूं ॥२॥
राव महानंदे देत । आज्ञा बसवी पालखीत । विप्र राजे म्हणवीत । भूमी जिंकित येती तेथ ॥३॥
ते कुमसी मध्यें यती । त्रिविक्रमभारती । त्रिवेदी जाणुनियां येती । त्या म्हणती वाद करीं ॥४॥
जरी मैत्रद्विज असे । तरी करील कीं असें । कुबुद्धि हे विप्र जसे । हरती तसें करावें ॥५॥
यांची वांछा गुरु पुरवील । असें म्हणोनी त्यां तत्काळ । यती आणी गुरुजवळ । सांगे सकळत्रिविक्रम ॥६॥
वाद्यां शोधीत हे आले । यांणीं माझें न ऐकिलें । मग येथें आणिले । या शिक्षिले पाहिजेत ॥७॥
गुरुजी म्हणती तया । नेणो आम्ही जयाऽजया । वाद आम्हाम कासया । तुम्हीं वाया मरुं नका ॥८॥
विप्र वचन बोलती । तुम्हां काय विद्या येती । तें ऐकूनि गुरु म्हणती । गर्व किती करितां हा ॥९॥
गर्वे लोकीं किती मेले । बाण रावण खपले । व्यर्थ कौरवादी मेले । आरंभिलें काय हें तुम्हीं ॥१०॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सारे उन्मत्तद्विजाख्यानं नाम पंचविशोऽध्यायः

 

श्री गुरुदेव दत्त...!!!

Sep 20

सप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चोविसावा

श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) रचित "श्री सप्तशती गुरूचरित्र"


तो कुमसीग्रामीं वसे । तेथससैन्य गुरु येतसे । त्रिविक्रमा ध्यानीं दिसें । देव येतसे नदीतीरीं ॥१॥
तेथें पळत ये यती । तया दिसे सैन्य यती । गुरु त्याचा गर्व हरती । त्या दाविती निजरुप ॥२॥
तो कर जोडुनी प्रार्थी । गुरु तया गती देती । गाणगापुरी मागुती । गुरु येती सैन्यासह ॥३॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सारे विश्वरुपदर्शन नाम चतुर्विंशोऽध्यायः

 

श्री गुरुदेव दत्त...!!!

Sep 19

सप्तशती गुरूचरित्र :: अध्याय तेविसावा

श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) रचित "श्री सप्तशती गुरूचरित्र"


ही कानि वार्ता ऐकून । सर्व पुसे नृप येऊन । गुरु महात्म्य ऐकून । ससैन्य येऊन प्रार्थी ॥१॥
म्हणे वसूनी गांवात । उद्धरीं आम्हां तूं दैवत । ते मानी गुरुनाथ । पालखींत बसवी भूप ॥२॥
न वर्तंते प्रभुधियः । परतंत्रास्तथाऽपि हि । भक्तिप्रियो भक्तिगभ्यो । भक्ताधीनत्वमेत्यजः ॥३॥
भूपें तेव्हां उत्सवून । त्यां आणिलें पालखींतून । अश्वत्थातळीं येऊन । ब्रह्मराक्षसा पहाती ॥४॥
तोही तया पदीं लागे । गुरु राक्षसासी सांगे । संगमीं न्हातां तूं वेगे । होसी अंगे येथ मुक्त ॥५॥
तो तद्धा मीं पावला । ग्रामी मठ गुरुला दिल्हा । ऐकूनि गुरुची लीला । निंदी तयाला एकयति ॥६॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते ब्रह्मराक्षसोद्धरणं नाम त्रयोविंशोऽध्यायः

 

श्री गुरुदेव दत्त...!!!

◄ Older PostsNewer Posts ►
Start Jap Online